रेणापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
रेणापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर दि. 12 : बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना लातूर ग्रामीण योजनेतंर्गत रेणापूर तालुक्यातील मोटेगाव, सिंधगाव, रामवाडी को. , सुकनी, लहानेवाडी, नरवटवाडी, मानुसमारवाडी, इटी, डीघोळ देशपांडे येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका तसेच भोकरंबा, मोटेगाववस्ती, दामोदर तांडा, राठोडनगर तांडा, बिटरगाव, गोढाळा, यशवंतवाडी, कोष्टगाव, आखाडावस्ती, खरोळा, रामवाडी ख. , मोहगाव, पानगाव, दिवेगाव, वालावस्ती, घनसरगाव तांडा, भंडारवाडी वस्ती, शेरा, खानापूर, सांगवी अंगणवाडीतील प्रत्येकी एक व कामखेडा, डीघोळ देशमुख येथील दोन मदतनीसांची पदे भरण्यात येणार आहे. यासाठी गावातील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी 2 फेब्रुवारी, 2023 व 30 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार महिला उमेदवार भरण्यात येणार असून महिला बारावी उत्तीर्ण असावी. अर्ज करण्यसास इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांनी माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना रेणापूर कार्यालयाशी 11 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच कार्यालयात अर्ज स्विकारले जाणार आहेत, असे रेणापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment