जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारांसाठी 2 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

 

जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारांसाठी

2 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

        लातूर,दि.26(जिमाका):-  कोशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातंर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर येथे दिनांक 2 डिसेंबर, 2021 रोजी जिल्हास्तरीय, शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यास लातूर, स्थानिक व पुणे एसएमपी सर्व्हिसेस प्रा.लि. भोसरी पुणे, प्रभा इजिनिअरींग प्रा. लि. , वेलमेड लूकींग सिस्टीम प्रा. लि. , मरेली टालब्रोस क्लासेस सिस्टीम प्रा. लि., याझाकी इंडिया प्रा. लि. या कंपन्या उपस्थित राहणार आहेत.

       आयटीआय / एमसीव्ही उत्तीर्ण व्यवसाय फिटर , मोटार मेकॅनिक, शीट मेटल, टर्नर , वेल्डर, आर. ए. सी , विजतंत्री ओएमटी, विजती, इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल, इलेक्ट्रिशिएन इलेक्ट्रीकल मेकानिक भरती मेळाव्यास येतांना सोबत दहावी, बारावी मार्कशिट, आयटीआय, एमसीव्ही मार्कशिट, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित व मुळ प्रती सोबत घेवून यावेत.

         ज्या आयटीआय व एमसीव्हीसी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप शिकाउ उमेदवारी मिळालेली नाही, त्यांनी दिनांक २ डिसेंबर, २०२१ रोजी सकाळी 10-00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी चौक, लातूर येथे उपस्थित राहून शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर  यांनी केले आहे.  

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत