महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे - सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांचे आवाहन

 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 पात्र लाभार्थी  

शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे

                            -- सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांचे आवाहन

लातूर,दि.3 (जिमाका):- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत लातूर जिल्हयात 57   हजार 393 लाभार्थ्यांच्या कर्ज खाती एकुण 338.43 कोटी रुपये जमा झालेले आहेत. मात्र अद्याप 1 हजार 749 लाभार्थ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे कर्जाच्या लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. तरी पात्र लाभार्थी शेतक-यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.

          शासनाने पात्र लाभार्थी शेतक-यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत कर्ज मुक्ती देण्याची योजना केली होती. जिल्हयातील 60373 कर्ज खाती विशिष्ट क्रमांकासह योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहेत. पैकी 58624 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घेतले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 57393 लाभार्थ्यांच्या कर्ज खाती एकुण 338.43 कोटी रुपये जमा झालेले आहेत. मात्र अद्याप 1749 पात्र लाभार्थी शेतक-यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण करुन घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जाची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. तरी पात्र लाभार्थी लाभार्थी शेतक-यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत त्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी संबंधीत बँक शाखा, विविध कार्यकारी सोसायटया आणि तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे संपर्क करावा. तसेच आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. अन्यथा सदरची योजना शासनाकडुन बंद करण्यात आल्यास त्या नुकसानीची व परिणामाची जबाबदारी व्यक्तीगतरित्या संबंधीत लाभार्थ्याची राहील.

                                                        ****

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत