अनुसूचित जातीतील गटाई कामगारांना शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे गटई स्टॉलसाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज करावेत -- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

 

अनुसूचित जातीतील गटाई कामगारांना शंभर टक्के अनुदानावर

पत्र्याचे गटई स्टॉलसाठी  30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज करावेत

-- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

 

लातूर,दि.11 (जिमाका):- सन 2021-2022 या वर्षासाठी अनुसूचित जातीतील गटाई कामगारांना शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे गटई स्टॉल देण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.  

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आसावा, अर्जदार अनुसूचित जातीचा असावा, अर्जदाराचे उत्पन्न  ग्रामीण भागासाठी 40 हजार शहरी भागासाठी 50 हजार असावे. अर्जदाराचे सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.  गटई स्टॉल लावण्याच्या जागेचा आठ उतारा अथवा भाडे करारनामा असणे आवश्यक आहे. रुपये शंभरच्या बाँड पेपरवर विहीत नमुन्यातील करारनामा आवश्यक आहे. या कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज भरून लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुनी डालड फॅक्टरी, गुळ मार्केट येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करावीत. तरी अनुसूचित जातीचे गटई कामगारांनी जास्तीत-जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन   लातूर समाज कल्याण कार्यालय सहाय्यक आयुक्त एस.एन.चिकुर्ते यांनी  केले आहे.

                                                   

                                        ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत