2020-21 साठी रि-अप्लाय करण्यासाठी व सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्यवृत्ती अर्ज करावेत

 

2020-21 साठी रि-अप्लाय करण्यासाठी व सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्यवृत्ती अर्ज करावेत

 

 

लातूर,दि.11(जिमाका)-जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 साठी  रि-अप्लाय करण्यासाठी व सन 2021-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (FREESHIP) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आलेले आहे.

तेंव्हा सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अनु जाती प्रवर्गाचे शिष्यवृत्ती भरण्याची अंतीम दिनांक 13 ऑगस्ट 2022 व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक 25 ऑगस्ट 2022 ही अंतीम मुदत देण्यात आलेली आहे.

तरी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास ऑनलाईन फॉरवर्ड करावे. विहीत मुदतीनंतर महाविद्यालया स्तरावर अथवा विद्यार्थी लॉगीनवर अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी आर्थिक जबाबदारी संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्याची राहील याची सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहायक आयुक्त्‍ समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.

                                 000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत