जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020 गुणपत्रके व प्रमाणपत्रे उपनिबंधक कार्यालयाकडे उपलब्ध्‍

 

जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020

गुणपत्रके व प्रमाणपत्रे उपनिबंधक कार्यालयाकडे उपलब्ध्‍

लातूर, दि. 10 (जिमाका):-  माहे ऑक्टोंबर - 2021 मध्ये झालेल्या जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020 चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध केलेला आहे. या परीक्षेला बसलेल्या सर्व परिक्षार्थ्यांची गुणपत्रके व प्रमाणपत्रे परिक्षार्थ्यांना वितरित करण्यासाठी संबंधित केंद्राचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे देण्यात आलेले आहेत.

परिक्षार्थींनी एका महिन्याच्या कालावधीत त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित केंद्रावरून  स्वत: घेऊन जावे. तपशिलासाठी इतर   https://sahakarayukta.maharashtra.gov.in  मधील “महत्वाचे दुवे मधील जी. डी. सी. ॲण्ड ए. मंडळ”  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे पुणे जी. डी. सी. ॲण्ड  .  बोर्ड तथा  उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण), सहकारी संस्था सचिव महेंद्र मगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत