जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून वैरण अनुदान योजना अर्ज करण्याचे आवाहन

 

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून वैरण अनुदान योजना

अर्ज करण्याचे आवाहन

 

*लातूर,दि.2(जिमाका):-* सन-2022-23 या आर्थिक वर्षासाठी दुभत्या जनावरांना खादय उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रंमा अंतर्गत (सर्वसाधारण योजना) संकरीत बाजरा  न्युट्रीफीड, मल्टीकट बाजरा / शुगरकेज वैरणीचे 100टक्के  अनुदानावर बियाणे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परीषद लातुर कडुन वाटप करण्यात येणार आहे.जिल्हयातील 10 ही तालुक्यातुन या योजनेसाठी अर्जदाराकडुन अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी(वि) पं.स/ किंवा नजीकच्या पशुवैदयकिय दवाखान्याकडुन उपलब्ध करून घ्यावेत.

          पुर्णपणे भरलेले विहित नमुण्यातील अर्ज दि.03 ऑगस्टं 2022 ते 18 ऑगस्टं 2022 या कालावधीत संबधित पशुवैदयकिय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थीची निवड पात्र अर्जामधुन सोडत पदधतीने करण्यात येणार आहे.त्यामुळे 19 ऑगस्टं 2022 नंतर प्राप्त्‍ होणा-या किंवा अपुर्ण अर्जांचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने लातुर जिल्हयातील  सर्व जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी व डॉ.आर.डी.पडीले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परीषद लातुर यांनी केले आहे.

 

                                                       000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित