माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना 2022-23

 

माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी

शिष्यवृत्ती योजना 2022-23

 

*लातूर,दि.26(जिमाका)* लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, ज्यांचे पाल्य सन 2021-22 मध्ये दहावी व बारावी मध्ये 60 टक्के गुण घेवून पास झाले आहेत व वैद्यकीय , अभियांत्रीकी, बी.एस.बी. ए. डिग्री कोर्सेस, बी.सी.ए., बी.बी.ए., बी फॉर्म, बी.एङ एल.एल.बी. व एम फॉर्म मध्ये शिक्षण धेत आहेत अशा माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांचे नवीन व जुनी शिष्यवृत्ती 2022-23 साठी अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन सादर करावेत.

तसेच याबाबत फॉर्म व इतर माहिती कार्यालयात उपलब्ध्‍ करुन घ्यावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                               000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत