निवड झालेल्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे पुरवठा करण्यासाठी इच्छुक पुरवठाधारकांने अर्ज करावेत

 

निवड झालेल्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे

पुरवठा करण्यासाठी इच्छुक पुरवठाधारकांने अर्ज करावेत

 

           *लातूर,दि.24,(जिमाका):-* सन 2022-23 या पुरवठा वर्षाकरीता विशेष घटक व नाविण्यपुर्ण योजना व इतर योजनेअंर्गत निवड झालेल्या लाभार्थींना दुधाळ जनावरे (गाई / म्हैशीचा) पुरवठा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात पुरवठा धारकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक पुरवठा धारकाने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर या कार्यालयात दिनांक 24 ऑगस्ट, 2022 ते 8 सप्टेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

          सदरील योजनेच्या अटी व शर्ती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे असेही पत्रकात नमुद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित