रुग्णालय स्तरीय तक्रार अधिकारी यांना एचआयव्ही आणि एड्स कायद्याविषयी मार्गदर्शन

 रुग्णालय स्तरीय तक्रार अधिकारी यांना

एचआयव्ही आणि एड्स कायद्याविषयी मार्गदर्शन

लातूर, दि. 11 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक अंतर्गत लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालच्यावतीने रुग्णालय स्तरीय तक्रार अधिकारी यांच्यासाठी एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 2017, विषयक कार्यशाळा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत घेण्यात आली.

कार्यशाळेस मुख्य मार्गदर्शक म्हणून लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकारणचे सचिव तथा न्यायाधीश पी. पी. केस्तीकर उपस्थित होते. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे ॲड. ए.जे.तिवारी, ॲड. जी.जे. मिटकरी उपस्थित होते.

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवन जगत असतांना भेदभाव आणि अन्य प्रश्नाला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 2017 हा कायदा करण्यात आला. या कायद्याचे धोरण, स्थापना, तक्रार व तक्रार निवारण यंत्रणा, लोकपाल व तक्रार अधिकारी यांची भूमिका इत्यादीबाबत रुग्णालय स्तरावर असलेले तक्रार अधिकारी यांना मार्गदर्शन झाले.

कार्यशाळचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले यांनी केले. जिल्हा स्तरावरील एचआयव्ही, एड्सबाबत असलेल्या सेवा सुविधाबाबत माहिती दिली. उत्कृष्ठ काम केल्याबाबत देवणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निलकंठ सगर, किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सुजाता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत