कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांच्या बलिदानाचे स्मरण

 कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांच्या बलिदानाचे स्मरण

लातूरदि. 29 (जिमाका) : कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद युध्द स्मारक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून श्रध्दाजंली वाहण्यात आली.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.)सैन्य सेवेतील सेवानिवृत्त अधिकारीभारतीय माजी सैनिक संघटनेचे यांचे पदाधिकारीजिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारीमाजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नीवीरमाता व वीरपिता यावेळी उपस्थित होतेशहीद जवानांच्या वीरपत्नीवीरपितावीरमाता यांचा शालपुष्पगुच्छ देवून यावेळी सन्मान करण्यात आला.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत