तृतीय पंथीयांसाठी आरोग्य शिबीर व जनजागृती

तृतीय पंथीयांसाठी आरोग्य शिबीर व जनजागृती लातूर, दि. 7 : तृतीयपंथीयांच्या आरोग्य तपासणी व हक्कांविषयी जनजागृतीसाठी एकदिवसीय कार्यशाळा लातूर येथे पार पडली. सहायक आयुक्त समाज कल्याण, लातूर आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय भवन, आडत लाईन येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी उमेश सानवणे होते. अधीक्षक आर. व्ही. सुरकुटलावार, एस. डी. सराफ, एन. डी. शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या समस्या, हक्क व अधिकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा सानवी जेठवाणी यांनी कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रादेशिक उपायुक्त उमेश सानवणे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. तसेच transgender.dosje.gov.in या पोर्टलवर नोंदणी न केलेल्यांनी आवश्यक कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जमा करावीत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले. आभार प्रणिता सूर्यवंशी यांनी मानले. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास