पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत लातूर, दि. ७ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (रविवार, दि. १६ ऑगस्ट वगळून) दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास