लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत
लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत
लातूर, दि. ७ :- लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत सैनिक मुला-मुलींचे वसतिगृह व विश्रामगृहासाठी विविध अशासकीय पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा तसेच इतर पात्र नागरिकांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.
वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. ३१,८७५) तसेच सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २४,८७५) उपलब्ध आहेत. स्वयंपाकी (महिला) पदासाठी ५ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १४,१०६), चौकीदार पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २१,१५९), सफाई कामगार पदासाठी ३ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) आणि माळी पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) भरण्यात येणार आहेत.
***
Comments
Post a Comment