उच्च शिक्षणासाठी वसतिगृह प्रवेशास अर्ज सुरू

उच्च शिक्षणासाठी वसतिगृह प्रवेशास अर्ज सुरू लातूर, दि. ६ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ७ ते ३१ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० क्षमतेची दोन वसतिगृहे कार्यरत आहेत. येथे निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असावे. बारावीनंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. शिक्षण संस्थेच्या शहरात विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकृती ७ ते ३१ ऑगस्ट, छाननी १ ते ७ सप्टेंबर होणार आहे. पहिली निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी दुसरी यादी २१ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. दुसऱ्या यादीतील प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी मुलींच्या वसतिगृहासाठी गृहपाल वृषाली बडे (९०२८२६११८३) व मुलांच्या वसतिगृहासाठी तिरुके सुरज (८३२९४४७४१०) यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास