Posts

Image
लातूर जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी नियोजन समितीच्या माध्यामातून प्रयत्न करणार                         -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर   लातूर,दि. 30: लातूर जिल्हयाचे मानव विकास निर्देशकांत फारच खालचे स्थान आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून शिक्षण, आरोग्य व दरडोई उत्पन्न्‍ या तीन बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत करून लातूर जिल्हयाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामागार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील-कव्हेकर, आमदार सर्वश्री सुधाकर भालेराव, विनायक पाटील, ॲड. त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, मुख्यकार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, महापालिका आयुक्त रमेश पवार, अतिरिक्त म...
Image
सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वयंसेवी संस्थांनी कार्य करावे                    -सामाजिक न्यायमंत्री राज कुमार बडोले          लातूर,दि. 29: सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वयसेवी संस्थांनी कार्य केल्यास तळागाळातील शेवटच्या घटकांतील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.                उजळंब ता. चाकूर येथील जन प्रतिष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. बडोले बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. अरवत, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गट विकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, उजळंबचे सरपंच संतोष बोईने, श्री. मोहन माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.             ...
Image
लातूर विभागांतर्गत शिष्यवृत्तीची प्रलंबित सर्व प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत                                                     -सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले          लातूर,दि. 29: शासनकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेऊन मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिक्षणपूर्ण करत असतात. परंतू सन 2016-17 या शैक्षणिक  वर्षात लातूर विभागाच्या चारही जिल्हयात शिष्यवृत्ती व शिक्षण फी शुल्क माफी योजनांचे अर्ज मोठया प्रमाणावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. तरि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी  प्रलंबीत शिष्यवृत्ती अर्जावर  त्वरीत कार्यवाही करून जानेवारी 2017 अखेरपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय  आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. ...
जलयुक्त अंतर्गत 1 हजार 327 कामांचे फोटो सिमनिक प्रणालीवर अपलोड                    लातूर,दि.27: लातूर जिल्ह्यातील सन 2015-16 साठी डी पी डी सी अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून एकूण जिल्ह्यातील 9 यंत्रणामार्फत 202 गावातील 1 हजार 359 कामे मंजूर करण्यात आली त्या प्रमाणे सिमनिक  (simnic) प्रणालीवर 1 हजार 327 कामे अपलोड केलेली आहेत तसेच MRSAC प्रणालीवर 1097 कामांचे फोटो अपलोड केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे.               जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर झालेल्या कामाची माहिती   www.mahasim.nic.in  या संकेत स्थळावर भरण्यात आली असून लातूर जिल्ह्याचा कोड क्र. 32276 आहे. या संकेतस्थळावर सर्व कामाची माहिती तालुकानिहाय, गावनिहाय, यंत्रणानिहाय, कामनिहाय पाहता येईल तसेच सदरील कामाचे फोटो http://mrsac.maharashtra.gov.in/jalyukt या संकेतस्थळावर पाहता येईल, असे श्री. पोले यांनी सांगितले आहे.  ...
Image
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून लोकराज्य अंकाची पाहणी                     लातूर,दि.26: येथील टॉऊन हॉलच्या मैदानात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित विविध शासकीय यंत्रणांच्या योजनांची माहिती सांगणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.             यावेळी जिल्हाधिकारी श्री. पांडुरंग पोले व अन्य मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या प्रदर्शनात ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल लावण्यात आलेला होता. जिल्हाधिकारी पोले यांनी लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट देऊन लोकराज्यच्या मराठी, इंग्रजी व उर्दु अंकाची पाहणी केली. तसेच ऑक्टोंबर 2006 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषांक व चालू महिन्याचे नागपूर अधिवेशनाबाबतचे अंक माहिती कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी पोले व मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.     ...
Image
        व्यापारी व सेवा पुरवठादारांच्या सेवेत कमतरता                            असल्यास ग्राहकांनी तक्रारी नोंदवाव्यात                                                              -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले                     लातूर,दि.26: प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक व विक्रेता असतो. ग्राहक म्हणून व्यक्तीने आपल्या हक्कासाठी झगडलेच पाहिजे. तसेच व्यापारी व  सेवा पुरवठादारांच्या सेवाबाबत कमतरता असल्यास ग्राहकांनी त्याबाबतच्या तक्रारी तात्काळ नोंदविण्याची...
Image
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन लोकांनी ‘ह्याच देही ह्याच डोळा’सोहळा पाहावा       लातूर दि.22:- मुंबईलगतच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 ला होत आहे. हा भूमीपूजन सोहळा ‘ह्याच देही ह्याच डोळा’ पाहण्याची संधी लातूर जिल्ह्यातील जास्तित जास्त जनतेनी घ्यावी. प्रमुख नद्यांचे पाणी व गडकिल्यावरची माती :-        हा सोहळा संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. क्षेत्र :-        राजभवनापासून जवळच असणा-या अरबी समुद्रातील सुमारे 16 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात भव्य स्मारक होणार असून यात शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभारला जाणार असून या पुतळ्याची उंची जगात सर्वात जास्त असणार आहे. तेजस्वी व गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब :- ...