Posts

Image
लातूर महापालिका निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे पार पाडावी                                                  - राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया           लातूर, दि. 13:  लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. सदरची निवडणूक प्रशासनाने निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे पार पाडावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिले.               लातूर शासकीय विश्रामगृहातील सभागृहात लातूर महापालिका निवडणूक कामाच्या आढावा बैठकीत श्री. सहारिया बोलत होते.  यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक पु...
Image
“ मतदार जागृतीचा….. सेल्फी पॉईंट ”      लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून या निवडणूकीसाठी  एकुण 2 लाख 77  हजार 775 मतदार मतदान करणार आहेत.            त्यामुळे प्रशासनाकडून दिनांक 19 एप्रिल 2017 रोजीच्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवून लोकशाही प्रणाली  बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे.             राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडूरंग  पोले यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त रमेश पवार व प्रशासन मतदार जनजागृतीसाठी मोहिम राबवित असून या मोहिमेस  मतदारांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.               होय, मी मतदान करणारच,  तुम्ही पण मतदान करा, व  सेल्फी पॉईंट--- य...
Image
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत लातूर जिल्ह्याचा प्रगतीचा  जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा लातूर दि.06:- निलंगा नगर परिषद व शिरुर अनंतपाळ नगर पंचायतीस जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी भेट देवून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाचा आढावा घेतला व प्रत्यक्ष स्थळ पहाणी करुन याबाबत देण्यात आलेले उद्दिष्ट शिघ्रगतीने मुदतीत पुर्ण करण्याबाबत संबंधित मुख्याधिकारी व पदाधिकारी यांना सुचना  दिल्या. तसेच नगर परिषद अंतर्गत प्रभाग निहाय जास्तीत जास्त कमी वेळेत हगंणदारी मुक्त होणा-या प्रभागास शासनामार्फत रुपये 10 लाख बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत. दिनांक 1 मे 2017 पासून शासनाने जी शहरे हगणंदारी मुक्त होणार नाहीत अशा शहरांना विकास निधी उपलब्ध करुन दिला जाणार नाही   असे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास निधीही रोखुन धरण्यात येणार आहे व यापुढे नागरीकांना रेशनकार्डावरील धान्य व तसेच कोणत्याही शासकीय लाभ शौचालय नसल्यास दिले जाणार नाहीत  जिल्हाधिकारी  पोले यांनी  स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ...
Image
नैसर्गीक आपत्तीमध्ये शासन शेतक-यांसोबत आहे                                     - पालकमंत्री          लातूर,दि. 19: जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतक-यासोबत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु असून अहवाल प्राप्त  झाल्यानंतर शासनाकडून शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कौशल्य विकास, कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.             औसा तालुक्यातील येलुरी व वरवडा या गावांमधील शेती पिकांची पाहणी प्रसंगी श्री. निलंगेकर शेतक-यांशी संवाद साधत होते.  यावेळी जालना लोकसभा मतदार संघाच...
Image
जल आराखड्याद्वारे उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे                                                         -निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे          लातूर,दि. 16: पाण्याची बचत ही काळाची गरज लक्षात घेवून विविध माध्यमांच्याव्दारे सुक्ष्म स्तरावरून म्हणजे गाव पातळीवरही जललेखा व जल आराखडा तयार करून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे व  भविष्यात पाण्याच्या पातळीत वाढ करून पाणीपातळी कायम राहावी या करिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी केले.              जलसंपदा विभाग लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिनांक 16 ते 22 मार्च 2...
Image
प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे आठ दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करावा                                             - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत          लातूर,दि. 16: जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीमूळे झालेल्या पिकांच्या व इतर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे प्रशासनाने आठ दिवसात पूर्ण करावेत व त्याचा अहवाल त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.             येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पिक नुकसानीबाबत महसूल व कृषि अधिका-यांच्या बैठकीत कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर , विभागीय कृषि सहसंचालक शिरीषकुमार जमदाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडग...
Image
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून औसा तालुक्यातील पिक नुकसानीची पाहणी    लातूर,दि. 16: जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी वादळी वा-या सह पाऊस व  गारपीट झाल्याने औसा व लातूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे. औसा तालुक्यातील नांदुर्गा, टाका, मासुर्डी व येल्लोरी या गावातील पिक नुकसानीची पाहणी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली.             यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा कृषि विकास अधिकारी (जि. प.) बी. एस. रणदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील, औसा तहसिलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             कृषि राज्यमंत्री श्री. खोत यांनी शेतक-यांच्या शेतातील गहू, मका, हरभरा, द्राक्ष, ऊस, ज्वारी आदि पिकांच्या झालेल्या...