Posts

उमंग सेंटरच्या कार्याचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गौरव

Image
  उमंग सेंटरच्या कार्याचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गौरव   लातूर,दि.28 (जिमाका)- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे शासकीय ध्वजारोहणानंतर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर , लातूर यांचा गौरव करून प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज , खासदार सुधाकर सिंगारे , आमदार धीरज विलासराव देशमुख , आयुक्त अमन मित्तल , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल , महापौर विक्रांत गोजमगुंडे , जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर सह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.   या सेंटर चे वैशिष्ट्य म्हणजे येथील दिव्यांगासाठी न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट , अर्लीइंटर्वेंशन , ऑक्युपेसनल थेरपी , स्पीच थेरपी , बिहेवियर थेरपी , सायकॉलॉजिकल थेरेपी , फिजियोथेरेपी , स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत या थेरपी व ट्रीटमेंटचा द...

बळकट आरोग्य यंत्रणा -राजेंद्र पाटील-यड्रावकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

  बळकट आरोग्य यंत्रणा       राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख व गतिमान कामकाजावर भर देण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत कोविड कालावधीत कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवल्या गेल्या. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात आल्या. राजेंद्र पाटील-यड्रावकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य गेल्या दोन वर्षात सर्व विभागांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. देशात लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र कायम आघाडीवर आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्यात मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. आरोग्याला प्राधान्य गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देण्यात आला. कर्करोग, एचआयव्ही तसेच दुर्धर आजाराने बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी विशेष उपचार केंद्र सुरू केली जाणार आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना नवीन र...

आरोग्यसेवा सुसज्ज -राजेश टोपे मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

  आरोग्यसेवा सुसज्ज   कोविड-19 विषाणूच्या साथीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व आधिक अधोरेखित झाले आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांत सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविड साथीचा अतिशय समर्थपणे मुकाबला केला. कोविडच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे आव्हानही समर्थपणे परतवून लावू शकू, असा विश्वास आहे. या निमित्ताने आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. राजेश टोपे मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या दोन वर्षांत अहोरात्र काम करून कोविड-19 च्या कालावधीत अतुलनीय काम केले. पण त्याचबरोबर या कालावधीत आरोग्य व्यवस्था आणखी बळकट केली पाहिजे, याचीही जाणीव झाली. यासाठी मनुष्यबळ वाढवणे, यंत्रसामग्री खरेदी करणे, सुसज्ज इमारती उभारणे, रुग्णवाहिकांची खरेदी करणे अशा विविध स्तरावर काम सुरू करण्यात आले. यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गेल्या वर्षी कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा आपण समर्थपणे मुकाबला केला. पहिल्या लाटेत लॉकडाऊन करावे लागले. उद्योग, व्यवसाय बंद करावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कोविडचा...

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील 139 नगर पंचायत अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत-जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील 139 नगर पंचायत अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत   जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर   लातूर,दि.27(जिमाका):- लातूर जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदासाठीची सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात नगरपंचायत शिरुर अनंतपाळ अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला, नगर पंचायत चाकूर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण, नगर पंचायत देवणी अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती, नगर पंचायत जळकोट अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला , नगर पंचायत रेणापूर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे, नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यातील 139 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मंत्रालय , मुंबई येथे प्रधान सचिव ( नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणाली                 ( व्हिडीओ कॉन्फरन्स व्ही.सी.) द्वारे आयोजि...

ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे पारदर्शक, अतिक्रमणमुक्त व गुणवत्तापूर्ण करावीत - पालकमंत्री अमित देशमुख

Image
  ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे पारदर्शक, अतिक्रमणमुक्त व गुणवत्तापूर्ण करावीत n   पालकमंत्री अमित देशमुख लातूर दि.27 ( जिमाका ):-     रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहा तालुक्यांना 181 पाणंद शेतरस्ते 278 किलो मीटर लांबीच्या रस्त्यांना 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे गतिशिल, पारदर्शक, अतिक्रमणमुक्त व गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 181 पाणंद रस्त्यांच्या दूरदृष्यप्रणाली ( व्हिडीओ कॉन्फरन्स) द्वारे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार अभिमन्य पवार,   लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अहमदपूर आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन वाघम...

प्राचीन मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाकडून विकास आराखडा आखणार ; सुरुवात रेणापूरच्या रेणुका माता मंदिरापासून करणार - वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विकास मंत्री अमित देशमुख

Image
  प्राचीन मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व   विभागाकडून विकास आराखडा आखणार ; सुरुवात रेणापूरच्या रेणुका माता मंदिरापासून करणार   - वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विकास मंत्री अमित देशमुख ▪ ️ परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असलेल्या पाणगाव चैत्यभूमीचा विकास करणार ▪ ️ मराठवाड्यावर सूर्य प्रसन्न आहे, त्या ऊर्जेच सौरऊर्जेत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणार          लातूर दि. 27 ( जिमाका ) राज्यातील तुळजाभवानी, महालक्ष्मी मंदिर, रेणापूरचे रेणुका मंदिर या सारख्या प्राचीन मंदिराचा पुरातत्व विभागांतर्गत विकास आराखडा आखून त्या मंदिराचा विकास करणार असून त्याची सुरुवात रेणूका माता मंदिरापासून करु तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या पानगाव चैत्यभूमीचा विकास करणार असल्याची ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विकास तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.             रेणापूर नगर पंचायतीच्या 11 वॉर्डातील रस्ते विकासाचे तसेच औसा, लातूर...

सर्वसामान्यांना दिलासा- प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री, नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

  सर्वसामान्यांना दिलासा...   ऊर्जा विभागांतर्गत राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत माफक दरात नियमित वीज उपलब्ध करण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागांच्या माध्यमातून जनतेला आपत्तिप्रसंगी दिलासा देण्याचे काम गेल्या दोन वर्षात केले गेले. सर्वसामान्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णय व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री, नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्य शासन गेल्या दोन वर्षांपासून तळागाळातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवत असून त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. मुबलक वीज जुन्या धोरणामुळे वीजजोडणी देता येत नव्हती, मात्र नवीन ऊर्जा धोरणामुळे शेतकर्‍यांना सहज वीज देणे शक्य होणार आहे. तसेत मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत दरवर्षी एक लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. अपारंपरिक ऊर्जा धोरण, नवीन अपारंपरिक ऊर्जास्रोत वीज निर्मिती धोरण अंतर्गत वीज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली जाणार आहे. राज्यातील शेतकर्‍यांना दिवस...