Posts

सेवारत सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांचा दुर्देवी घटनेत मृत्यू; 29 जून रोजी पहाटे 2.30 वाजता पार्थिव पुणे येथे पोहचणार

  सेवारत सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांचा दुर्देवी घटनेत मृत्यू; 29 जून रोजी पहाटे 2.30 वाजता पार्थिव पुणे येथे पोहचणार             लातूर, दि.28 (जिमाका):- भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंट मधील 15 गार्डस बटालियनचे सेवारत सैनिक नंबर 15621167F हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव गाव थेरगाव ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर हे कर्तव्य बजावताना दिनांक 27 जून,2022 रोजी दुर्देवी घटनेमध्ये जखमी    (Gun Shot Injury)   होऊन 167 मिल्ट्री हॉस्पीटल पठाणकोट येथे दिनांक 27 जून, 2022 रोजी दुपारी 3.55 वाजता मृत घोषित केले आहे. त्यांचे पार्थिक अमृसर येथून दिनांक 28 जून, 2022 रोजी (23.55 वाजता) हवाई विमानाने निघून पुणे येथे दिनांक 29 जून, 2022 रोजी पहाटे 2.30 वाजता पोहचणार असून तिथून रस्ता मार्गे थेरगाव ता. शिरूर अनंतपाळ कडे येणार आहे , अशी माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.                        ...
Image
  *उत्तम शिक्षण नव्हे, तर तुमचा अनुभव तुम्हाला संपन्न करतो* *- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.*   *लातूर, दि.26:- (जिमाका):-* उत्तम शिक्षण घेऊन अनुभव नसेल तर फारसा उपयोग नसतो त्यामुळे उत्तम शिक्षणाबरोबर तुम्हाला मिळणारा अनुभव हा संपन्न करतो. त्यामुळे युवा पिढीने कोणत्याही व्यवसाय करीत असतांना वेतनाचा विचार न करता अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये एक आत्मविश्वास असायला हवा. त्यासोबतच मनातील एखादी कल्पना असायला हवी. व्यावसायिक क्षेत्रामधील मेहनत वाया जात नाही. शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाचे बॅलन्स असणे आवश्यक आहे. यातून आपल्या स्वत:चे कौशल्य विकास करु शकतो. यातून येणारी पिढीही आत्मनिर्भर भारत होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रतिपादन केले.   कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील युवक-युवतीकरिता कौशल्य विकास जनज...

मध्ययुगीन काळात लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या बारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात....!!

Image
  मध्ययुगीन काळात लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या बारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात....!!              लातूर दि.25(जिमाका) मध्ययुगीन काळात शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभर जनतेला मिळावे म्हणून अत्यंत कमी बाष्पीभवन होणाऱ्या बारवा विहरीची निर्मिती झाली. मागच्या चार पाच दशकात गावागावात आणि शहरात पाणी पुरवठा योजना आल्या... आणि "गरज सरो वैद्य मरो " या म्हणी प्रमाणे शेकडो वर्षे तहान भागविणाऱ्या बारवा कचरा कुंडी झाल्या. जिल्हा प्रशासनाने या बारवाचे संवर्धन करायचे ठरवले असून आज बारवाचे शहर रेणापूर, ज्या शहरात 16 बारव विहिरी आहेत. त्या शहरापासून त्या मोहिमेला जिल्हा नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, लातूर देवराईचे प्रवर्तक सुपर्ण जगताप, पर्यावरणासाठी काम करणारे पत्रकार दीपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ. बी. आर. पाटील,यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यमातील वरिष्ठ पत्रकार यावेळी उपस्थ...

कौशल्य विकास जनजागृती मेळावा लातूर दि.26 जून 2022

 

जिल्हा संसाधन व्यक्ती यांची सेवा लातूर जिल्ह्यासाठी विविक्षित कामांसाठी अर्ज करावेत

          जिल्हा संसाधन व्यक्ती   यांची सेवा लातूर           जिल्ह्यासाठी विविक्षित कामांसाठी अर्ज करावेत                * लातूर,दि.23(जिमाका)-* आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर नव्याने लाभ घेणाऱ्या तसेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रक्रिया उद्योगांचे विस्तार करण्यासाठी पाठपुरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची नामिका सूची (Panel of District Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनूसार अर्ज मागविण्यात येत आहेत.             पदनाम जिल्हा संसाधन व्यक्ती (District Resource Persons)   शैक्षणिक अर्हता- कोणतीही योग्य व्यक्ती जसे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, बँक अधिकारी, बँक मित्र, विमा प्रत...

डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

  डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु         * लातूर,दि.23(जिमाका)-* महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 26 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार सन 2016-17 पासून डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेले आहेत.शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया दिनांक 23 जून 2022 पासून सुरु करण्यात आली आहे.            डी.एल.एड.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेबाबतची सन 2022-23 ची प्रवेश नियमावली अध्यापक विद्यालयाची यादी , प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेशाबाबतची सूचना www.maa.ac.in या संकेतस्थळावरील ( Important Information) मध्ये उपलब्ध आहे. दि. 23 जून 2022 ते 7 जूलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.              त्याची ऑनलाईन पडताळणी होऊन विद्यार्थ्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येईल या संदर्भातील विद्यार्थ्याला वेळोवेळी एसएमएस ई-मेल SMS/E-mail द्वारे कळविले जाणार आहे. त्यास...

26 जून, 2022 रोजी सारथी कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन

  26 जून , 2022 रोजी सारथी कौशल्य विकास जनजागृती मेळा व्याचे आयोजन                * लातूर,दि.23(जिमाका)-* राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून मराठा , कुणबी , कुणबी - मराठा , मराठा - कुणबी या लक्षित गटाच्या आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहे . त्यांच्यासाठी रविवार दि. 26 जून 2022 रोजी कौशल्य विकास जनजागृती मेळावा आयोजन करण्यात आले आहे.          राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ), पुणे व जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , लातूर यांचे संयुक्त विद्यमाने मराठा , कुणबी , कुणबी - मराठा , मराठा - कुणबी या लक्षित गटातील युवक - युवतींसाठी कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन दि .26 जून 2022 रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृ...