Posts

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी स्पर्धा इच्छुक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

  खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी स्पर्धा इच्छुक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन                                                * -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी*               * लातूर,दि.24,(जिमाका):-* रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता खरीप 2022 हंगामातही शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. भात , ज्वारी , बाजरी , मका , नाचणी(रागी) , तूर , सोयाबीन , भूईमुग ब सुर्यफुल इ.   पिकांसाठी 31 ऑगस्टपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने   यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.            राज्यामध्ये पिकांची उत्...

लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजीदयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

  लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजीदयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती   लातूर,दि.22 (जिमाका):- लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला आहे, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत या गोष्टीचा विचार करुन बाहेरच्या कंपन्यांना बोलावून लातूरमध्ये रोजगार मेळावा घेण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूरच्यावतीने दयानंद महाविद्यालय सभागृहात" पंडित दिनदयाल उपाध्याय"' रोजगार मेळाव्याचे सकाळी 10 वाजल्यापासून आयोजन केले आहे. वेगवेगळ्या 76 उद्योग/ कंपन्या या मेळाव्यात सहभागी होत आहेत. पात्र युवकांनी या मेळाव्यात येवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. या मेळाव्यात रोजगार देणारे लातूर जिल्ह्यातील एकूण 65 आस्थापना / उद्योक यांची एकूण 598 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. तसेच पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद येथील एकूण 11 आस्थापना / उद्योजक यांनी 1 हजार 110 रिक्त पदे अध...

जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेसाठी ई-केवायसी (ekyc) प्रक्रिया पूर्ण करावी

  जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेसाठी ई-केवायसी ( ekyc ) प्रक्रिया पूर्ण करावी   *लातूर,दि.22(जिमाका)-* केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार ज्‍या लाभार्थ्‍यांचे ( ekyc) ई-केवायसी   होणार नाही त्‍या लाभार्थ्‍यांना पीएम किसान योजने‍च्‍या पुढील हप्‍त्‍याचा लाभ मिळणार नाही अशा सुचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. तरी लातुर जिल्‍हयातील पी.एम किसान योजनेसाठी पात्र शेतक-यांना आवाहन करण्‍यात येते कि , ज्‍या लाभार्थी शेतक-यांनी ( ekyc) ई-केवायसी   प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण केलेली नाही अशा पात्र लाभार्थी शेतकरी यांनी सदर प्रक्रिया   दि. ३१ ऑगस्‍ट २०२२ पुर्वी   पुर्ण करण्‍यात यावी.   असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे. केद्र शासनाकडून ग्राहक सेवा केद्र (CSC) सीएससी केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने (ekyc) ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रीकरण दर रुपये 15/- निश्चित करण्यात आला आहे. पी.एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पूढील एप्रिल-जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापुर्वी (ekyc) ई-केवायसी   प्र...

मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सेस आणि दिव्यांगासाठी 5 टक्के योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत

  मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सेस आणि दिव्यांगासाठी 5 टक्के* *योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत*   *लातूर,दि.22(जिमाका)-* समाज कल्याण विभाग जि.प. लातूर यांच्यामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सेस आणि दिव्यांगासाठी 5 टक्के सेस या योजनेअंतर्गत खालील योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या अर्जाचे नमुने सर्व   पंचायत समिती   स्तरावर उपलब्ध आहेत.   तरी खालील योजनांचा लाभ घेण्यात यावा.   असे अवाहन   मुख्य कार्यकारी प्रभु जाधव   यांनी केले आहे.          20 टक्के मध्ये मागासवर्गीय महिलांसाठी मिरची कांडप यंत्र, मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवठा करणे, मागासवर्गीय महिलांना मिनी पिठाची गिरणी पुरवठा करणे, मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशिन पुरवठा करणे, मागासवर्गीय व्यक्तींना लघुउद्योगासाठी शेळीपालन, नरेगातून विहिरी पूर्ण केलेल्या मागासवर्गीय व्यक्तींना 5 (HP) एचपी पाणबुडी वाटप करणे. त्यासोबत दिव्यांग   5 टक्के   योजनेसाठी दिव्यांगाना   व्हेंडींग स्टॉल, दिव्या...

शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Image
  शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील                                                                        - कृषी मंत्री अब्दुल सत्तार ▪ ️ शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, काही दिवसातच समितीची निर्णय अपेक्षित           लातूर,दि.21(जिमाका) शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढी पर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून,ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी योग्य तो निर्णय देईल. हे एन डी आर एफ च्या कक्षेत ब...

वीर नायक मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांना जानवळ येथे साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, लातूर पोलिसांकडून मानवंदना

Image
  वीर नायक   मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांना जानवळ येथे साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, लातूर पोलिसांकडून मानवंदना              लातूर दि. 21 ( जिमाका ) जानवळ येथील सुपुत्र वीर जवान   मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांना हजारो लोकांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.यावेळी लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.                   यावेळी लातूरचे खा. सुधाकर श्रृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, मा. आ. विनायकराव पाटील,उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी ( आय पी एस ) निकेतन कदम, चाकूर तहसीलदार शिवानंद बिडवे, सैनिक कल्याण कार्यालयाचे एस व्ही. घोंगडे,शिरूर अनंतपाळचे गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, गणेश हाके, शिवाजीराव काळे, जि. प. सदस्य रोहित वाघमारे, जानवळचे सरपंच यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.                   19 ऑगस्ट रोजी ...
Image
  *राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड* *मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटरची पाहणी करुन केले कौतूक*   लातूर,दि.20 (जिमाका):-   उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, लातूर येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली. नावीन्यपूर्ण उमंग सेंटर उभं केल्याद्दल कौतुक करून हे सेंटर जास्तीत जास्त प्रभावीपणे चालविण्यासाठी व दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.     उमंग सेंटर हे देशातील अतिशय चांगले तसेच राज्याला दिशा देणारे सेंटर आहे. या सेंटरमध्ये चालविण्यात येणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट, अर्ली इंटर्वेशन, ऑक्युपेसनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, सायकॉलॉजिकल थेरेपी, फिजियोथेरेपी, स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे व उमंग सेंटर मधील थेरपिस्ट तसेच कर्मचाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.   त्यांच्या बरोबर फोटो काढून घेतले. उपचार सुरु असलेल्या ति...