मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर 2022’ स्पर्धा
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर 2022’ स्पर्धा कालावधी 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 *लातूर,दि.28(जिमाका):-* महाराष्ट्राला लोककलांची आणि लोकगीतांची समृद्ध परंपरा आहे. निसर्गाशी संवाद साधणारी, श्रमपरिहारासाठी गायली जाणारी शेतकरी गीते,आदिवासी गीते, कोळीगीते, जात्यावरील ओव्या इ. लोकगीते जशी आहेत, तशी पोवाड्यासारखे शौर्यगीत, लावणीसारखे शृंगारंगीत यांसारखी लोकगीतेही आहेत. तसेच भारुडासारखे आध्यात्मिक प्रबोधनपर गीतही आहे. भोंडला-हादगा, मंगळागौर, फुगडी, झिम्मा यांसारखी गाणी त्यांच्या लय-तालबद्धतेमुळे आताही स्त्रिया गातात. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या प्रांतांनुसार स्थानिक लोकगीतेही विपुल प्रमाणात आढळतात. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे,...