अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी बँकांची सकारात्मक भूमिका आवश्यक - नरेंद्र पाटील
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी बँकांची सकारात्मक भूमिका आवश्यक - नरेंद्र पाटील · जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 682 प्रकरणांना मंजुरी · 11 कोटी 90 लाख रुपयांचा व्याज परतावा प्रदान लातूर , दि. 2 8 , ( जिमाका): मराठा समाजातील युवकांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसोबतच शासनाच्या इतरही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांची सकारात्मक भूमिका आवश्यक असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे, अरविं...