Posts

लोककल्याणाची गंगा : 'शासन आपल्या दारी’ उपक्रम

  विशेष लेख                                                                  दिनांक : 24 मे 2023   लोककल्याणाची गंगा : ' शासन आपल्या दारी ’ उपक्रम लोकशाहीमध्ये ‘लोककल्याण’ हे ब्रीद असतं... समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी ध्येयधोरणे राबवून आर्थिक स्तराबरोबर त्याचे सामाजिक स्तर उन्चाविण्याचे काम शासन करत असते. महाराष्ट्र या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. वेगवेगळ्या योजना , प्रकल्प , राबवून त्याची अमंलबजावणी करताना लाभार्थ्याला मिळालेला लाभ योग्य वेळी मिळाला, तर त्या लाभाचे महत्व त्याच्या लेखी खूप मोठे असते. शासकीय कचेरीत खेटे मारून पदरी पडलेला लाभ त्याला खूप थकवतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवें...

उदगीर येथे शुक्रवारी, जळकोट येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन

Image
  उदगीर येथे शुक्रवारी, जळकोट येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन   लातूर , दि.24 ( जिमाका): शासनाच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. या अंतर्गत उदगीर येथे शुक्रवारी (दि. 26) आणि जळकोट येथे शनिवारी (दि. 27) रोजी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ तत्काळ मंजूर करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्य शासनामार्फत राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर राबविले जात आहे. लातूर जिल्ह्यात 22 मे रोजी औसा येथून या उपक्रमास सुरुवात झाली असून प्रत्येक तालुकास्तरावर हे अभियान राबविले जाणार आहे. उदगीर येथील देगलूर रोडवरील राधेकृष्ण मंगल कार्यालयात 26 मे रोजी सकाळी   8 वाजता ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह विविध शासकीय वि...

महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात

Image
  महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात                                   -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.   लातूर , दि.24 ( जिमाका):- जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून आवश्यकतेनुसार तिथे फलक , गतिरोधक , रॅम्बलर ट्रिप बसवावेत. त्यामुळे वाहनांची गती कमी होईल आणि संभाव्य अपघात होणार नाहीत. राष्ट्रीय महामार्ग , सार्वजनिक बांधकाम विभाग , प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी ही संयुक्त पाहणी मोहीम राबवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सलीम शेख , प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिन्ही विभागाचे कार्यकारी ...

शेतकऱ्यांना थेट घरा पर्यंत लाभ पोहचवणारी "शासन आपल्या दारी " हा अभिनव उपक्रम - आ.अभिमन्यू पवार

Image
  शेतकऱ्यांना थेट घरा पर्यंत लाभ पोहचवणारी "शासन आपल्या दारी " हा अभिनव उपक्रम           - आ.अभिमन्यू पवार औसा तालुक्यातील 7009 लोकांना मिळाला लाभ औसा तालुक्यातील शेत रस्ते पॅटर्न आता राज्याने स्विकारला प्रशासनाकडून उभे केलेल्या 60 स्टॉलवर विविध योजनांच्या माहितीसाठी लाभार्थ्यांची रिघ   लातूर दि.22 ( जिमाका) शासनाच्या विविध विभागाच्या वतीने ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांचा लाभ तालुका स्तरावर जाऊन एकाच छताखाली एकाच दिवशी देण्याचा " शासन आपल्या दारी "हा अभिनव उपक्रम असून आज औसा तालुक्यातील 7009 लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले. अशा लोककल्याणकारी योजनाचा लाभ देण्याचे शासनाचे कौतुकास्पद पाऊल असल्याची भावना आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.     "शासन आपल्या दारी " ह्या उपक्रमाचा जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम आज औसा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. होते. यावेळी जिल्हापरिषदेचे म...

शंखी गोगलगाय या वर्षी रोखू या …!!

Image
  शंखी गोगलगाय या वर्षी रोखू या …!! शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या येणाऱ्या हंगामात सोयाबीन आणि इतर पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील कृषी विद्यावेत्ता विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.डॉ. अरुण गुडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही माहिती दिली आहे. शंखी गोगलगाय ही किड निशाचर असून रात्रीच्या वेळी सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत पिकांचे नुकसान करते. एकात्मिक नियंत्रण   :-   1. उन्हाळ्यात करावयाची कामे : • उन्हाळ्यात खोल नांगरट करून घ्यावी जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी वरील थरात येऊन कडक उन्हाच्या मदतीने नष्ट होतील. 2.       प्रतिबंधात्मक उपाययोजना : •सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) 05 सेमी रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा. •सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड 2.5% (स्नेलकिल) या औषधाच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात...

तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

  विशेष लेख तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण ! जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त   31   मेपर्यंत जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने हा विशेष लेख... तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते ,   तंबाखू   खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही ,   असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई - वडील ,   बायको ,   मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तब्बल   80   टक्के मुख कर्करोग हा केवळ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात...