Posts

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद

Image
  जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद लातूर ,   दि.   25 ( जिमाका): कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद लाभला. लातूर शहरातील अंबेजोगाई रोड येथील मुक्ताई मंगल कार्यालयात झालेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर , कृषि विकास अधिकारी सुभाष चोले , वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथील आहार तज्ज्ञ प्रियंका शेंडगे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी , कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर , मांजरा कृषि विज्ञान केंद्राच्या आहार तज्ज्ञ अंजली गुंजाळ , स्मार्टचे नोडल अधिकारी मोहन गोजमगुंडे , माविमचे जिल्हा व्यवस्थापक मन्सूर पटेल , आत्माच्या प्रकल्प उपसंचालक मनिषा बांगर , प्रशासन अधिकारी अशोक गिरवले उपस्थित होते. रानभाज्या महोत्सवांमध्ये लातूर जिल्ह्यातील 58 स्टॉल धारकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रानभाज्या यामध्ये तोंडली , तांदूळजा , अंबाडी , करटूले , ...
Image
    कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा आढावा दुष्काळी परिस्थितीबाबत तालुकानिहाय अहवाल त्वरीत सादर करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश ·          केंद्रिय पातळीवरही दुष्काळी परिस्थितीबाबत शासन पाठपुरावा करणार ·          शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेणार ·          पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने चारा लागवडीचे नियोजन करावे ·          सक्तीची कर्जवसूली तातडीने थांबवा, खरिप कर्जाचे पुर्नगठन करण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडू ·          गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवा ·          पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेत टँकरबाबतची निविदा प्रक्रिया लवकर पुर्ण करा   औरंगाबाद, दि. 25 (विमाका) मराठवाड्यात पावसाने ...

"महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाव्दारे राज्य महिला आयोगाची लातूर येथे जनसुनावणी

                                                    "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाव्दारे राज्य महिला आयोगाची लातूर येथे जनसुनावणी   लातूर दि. 25 (जिमाका) :  महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता "महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाव्दारे लातूर जिल्ह्यात दिनांक २८ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डि.पी.डि.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर जन सुनावणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे                        मां डण् याकरीता तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी. कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्व सुचना न देता...

रानभाज्या महोत्सव नव्हे हा आरोग्य जागर ...!!

Image
 विशेष लेख                                                        रानभाज्या महोत्सव नव्हे हा आरोग्य जागर ...!! शहरी लोकांना आरोग्यदायी रानभाज्याची ओळख व्हावी, म्हणून राज्य शासनाच्या 'आत्मा' कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागाच्यावतीने ऑगस्टच्या मध्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. 25 ऑगस्ट रोजी लातूर मध्ये मुक्ताई मंगल कार्यालय येथे एक दिवसाचा महोत्सव आयोजित केला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आताच्या पिढीलाही या भाज्याची ओळख नाही ती व्हावी म्हणून हा लेख प्रपंच...!! भारताची ओळख कृषी प्रधान देश अशी आहे. आपल्या देशाची लोकसंस्कृती कृषीच्या आवती भोवतीच राहिलेली आहे. इथल्या प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणात, इथल्या सांस्कृतिक वैभवातही कृषी संस्कृती डोकावते. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती ये...

जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध कायदा, तंबाखु नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

                                            जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध कायदा, तंबाखु नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करा -           जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर ,   दि.   25  ( जिमाका):   जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या भागात संशयित सोनोग्राफी केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ‘पीसीपीएनडीटी’ समितीच्या बैठकीत दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या विविध समित्यांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर ,  सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल ,  महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जावेद शेख ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले ,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. ...

अनधिकृत वजन काटे न वापरण्याचे आवाहन

  अनधिकृत वजन काटे न वापरण्याचे आवाहन लातूर ,   दि.   25  ( जिमाका):   शेजारच्‍या राज्यांतून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्‍वरुपात महाराष्ट्रात विकले जात असल्‍याने स्‍थानिक वजन काटे उत्‍पादक ,  दुरुस्‍तक व विक्रेते यांचे नुकसान होत आहे. तसेच राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. या अनुषंगाने राज्याचे वैध मापन शास्त्र नियंत्रक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तसेच चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची सुद्धा कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या अप्रमाणित वजन काट्यांमुळे ग्राहकांच्या हिताची हानी होत असल्याने जिल्ह्यात कोणीही अनधिकृत वजन काटे वापरू नयेत, असे आवाहन लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे वैध मापन शास्त्र उप नियंत्रक यांनी केले आहे. चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांना राज्‍य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्‍यता नाही. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्‍यक्‍ती त्‍यांचे स्टिकर लावून त्‍याची अनधिकृत विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्‍य वजनात मिळू शकत नाही. तसेच महाराष्‍ट्र शासनाचे महसुलावर परिणाम होत आहे. त्यामुळे ...

मराठवाडा मुक्तीसंग्राम व्याख्यानमाला जनकल्याण निवासी विद्यालयात भाऊसाहेब उमाटे यांनी उलघडला ­­­­मुक्तिसंग्रामाचा इतिहास

                                                              मराठवाडा मुक्तीसंग्राम व्याख्यानमाला जनकल्याण निवासी विद्यालयात भाऊसाहेब उमाटे यांनी उलघडला ­­­­मुक्तिसंग्रामाचा इतिहास लातूर दि. 24 (जिमाका) :  मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही 75 व्याख्यानांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक तथा इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे यांचे व्याख्यान बुधवारी हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. जनकल्याण निवासी विद्यालायचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, व्याख्यानमालेचे समन्वयक दिलीप कानगुले, विद्यालयाचे अधीक्षक दत्ताभाऊ माने यावेळी उपस्थित होते. मराठवाडा मुक...