महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी विहित कालावधीत अपिलांचा निपटारा करावा- सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी विहित कालावधीत अपिलांचा निपटारा करावा- सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव लातूर, दि. ०५: नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळावी, यासाठी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत अधिसूचित विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना नियत कालावधीत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. अशा सेवा उपलब्ध न झाल्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे आलेली प्रकरणे सुनावणी घेवून विहित कालावधीत निकाली काढावीत, अशा सूचना छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगर पालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमकर, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार...