Posts

Showing posts from May, 2024

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर ,  दि. 29 (जिमाका)  :   जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ,  सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 30 मे ,  2024 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  13 जून ,  2024  रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.      शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे ,  सोटे ,  तलवारी ,  भाले ,  दंडे ,  बंदुका ,  सुरे ,  काठ्या ,  लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही ,  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे ,  सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत ,  आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य

मतमोजणी केंद्र परिसरात 4 जून रोजी प्रतिबंधात्मक आदेश लागू

  मतमोजणी केंद्र परिसरात 4 जून रोजी प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर ,  दि. 29 (जिमाका)  :   भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च ,  2024 रोजी घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 41- लातूर (अ.जा) लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे ,  2024 रोजी मतदान झाले आहे. तसेच 4 जून ,  2024 रोजी शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोड ,  लातूर येथे सकाळी 8 पासून मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 4 जून 2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी संहीता 1973 चे कलम 144 अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड ,  लातूर या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटरच्या परिसरामध्ये मंडपे ,  दुकाने उभारणे ,  तसेच मोबाईल फोन ,  कॉर्डलेस फोन ,  पेजर ,  वायरलेस सेट ,  ध्वनिक्षेपक व इतर सेट ,  ध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन ,  संबंधि

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर ,  दि. 29 (जिमाका)  :   अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2024-25 अंतर्गत फुलपिक लागवड ,  मशरुम उत्पादन ,  हरीतगृह ,  शेडनेट हाऊस ,  प्लॅस्टिक मल्चिंग ,  20 एचपी टॅक्टर ,  शेतकरी अभ्यास दौरा ,  सामूहिक शेततळे ,  वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण ,  कांदाचाळ ,  पॅक हाऊस ,  व प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज करताना महा-डीबीटी पोर्टलचे  https://mahadbt.maharashtra. gov.in/farmer/login/login   किंवा  https://mahadbtmahait.gov.in/   या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉप ,  सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी ),  ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतील. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी सातबारा, आठ अ ,  बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला

शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणांचा आग्रह न धरण्याचे कृषि विभागाचे आवाहन

  शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणांचा आग्रह न धरण्याचे कृषि विभागाचे आवाहन लातूर ,  दि. 29 (जिमाका)  :   जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरु असून अहमदपूर व जळकोट तालुक्यामध्ये कापूस पिकाचा पेरा केला जातो. सर्व कंपन्यांचे सर्व कापूस बी.टी. वाण चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यंनी कोणत्याही एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. तसेच कापूस बियाण्यांचा विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कृषि सेवा केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल ,  असे त्यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील शेतकरी विविध कंपन्याच्या कापूस बियाण्यांना पसंती देतात. या बियाण्यांना मागणी असल्याने त्यांच्या विक्रीत वाढ होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. यातून विक्रेत्यांकडून या बियाण्यांची जादा दराने विक्री केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर तालुका कृषि अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची कृषि केंद्र स्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जादा दराने बियाणे विक्री रो

जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
  जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -           जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ·           योजनेच्या कामाबाबत जिल्हास्तरावर दैनंदिन आढावा घेतला जाणार लातूर ,  दि. 2 7  (जिमाका)  :   जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामांना गती देण्याबाबत वारंवार सूचना देवूनही काही कामे अद्यापही अपेक्षित गतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. या कामांना गती देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. पाणी टंचाई उपाययोजना आणि जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप अभियंता यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांची यावेळी उपस्थिती होती. जल जीवन मिशनच्या विहिरी, बांधकामे यासारखी कामे पाव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद

  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  नव्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद लातूर ,  दि. 2 4  (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने  1  जानेवारी , 2024  पासून बस तिकिटासाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्ययावत केली आहे. या आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून  1  जानेवारी ते  20  मे ,2024  पर्यंत राज्यातील  12  लाख  92  हजार तिकिटांची ऑनलाईन विक्री झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत  9  लाख  75  हजार तिकीटांची विक्री झाली होती. यंदा सुमारे  3  लाख अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. नवीन या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे राज्यात दररोज अंदाजे  10  हजार तिकीटे काढली जात आहेत. प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्यासाठी एसटीने आपल्या  npublic.msrtcors.com   या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच भ्रमणध्वनीवर  MSRTC Bus Reservation  ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये  1  जानेवारी , 2024  पासून अमुलाग्र बदल करुन त्या अद्ययावत करण्यात आल्या

पाणी टंचाई उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
  पाणी टंचाई उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढा -           जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ·           जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा आढावा ·           गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्याच्या सूचना ·           वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश लातूर ,  दि. 2 4  (जिमाका)  :   पाणी टंचाई निवारण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव तीन दिवसांच्या आत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांच्यासह सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाणी टंचाई निवारण्यासाठी मंजू

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नियमित शुल्कासह 7 जूनपर्यंत स्वीकारले जाणार

  इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज  नियमित शुल्कासह 7 जूनपर्यंत स्वीकारले जाणार लातूर ,  दि. 2 4  (जिमाका) :  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र   अर्थात इयत्ता  बारावी च्या  फेब्रुवारी-मार्च  २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या   परीक्षेचा निकाल  २१   मे ,  २०२४   रोजी ऑनलाईन जाहीर झालेला  आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट ,  २०२४   मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस पुनर्परिक्षार्थी ,  यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेतंर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे विद्यार्थी ,  आयटीआय विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संसथेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रिडेट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. इयत्ता बारावी  पुरवणी  परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे  अर्ज  ऑनलाईन पध्दतीने  www.mahahsscboard.in   या संकेतस्थळावर  स्वीकारण्यास २७ मे २०२४ पासून प्रारंभ होणार असून नियमित शुल्कासह ७ जूनपर्यंत अर्ज स्वीक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी इच्छुक संस्थेने प्रस्ताव सादर करावेत

  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा  प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी इच्छुक संस्थेने प्रस्ताव सादर करावेत ·           प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 मेपर्यंत ·           संस्थेची कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक लातूर ,  दि. 2 2  (जिमाका)  :   साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍यावतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी संस्थेची निवड केली जाणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेल्या संस्थांनी आपला प्रस्ताव दोन प्रतीत 31 मे ,  2024 पर्यंत लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबाचे सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी ,  त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी, यासाठी समाजातील गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाच

बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शाळापूर्व तयारी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
  बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी  शाळापूर्व तयारी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे   ·           शाळापूर्व तयारी अभियान विभागस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन ·           लातूरसह नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचाही सहभाग ·           इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी गावस्तरावर विशेष उपक्रम लातूर ,  दि. 21 (जिमाका)  :   इयत्ता पहिलीतील प्रवेश हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. येथूनच खऱ्या अर्थाने औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. त्यामुळे या बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शाळापूर्व तयारी अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांची योग्य प्रकारे क्षमता बांधणी व्हावी, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. बालशिक्षण व मानवशास्त्र, एससीईआरटी, पुणे द्वारा आयोजित स्टार्स प्रकल्प अंतर्गत लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) वतीने लातूर येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालय येथे आयोजित शाळापूर्व तयारी अभियान विभागस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी

खरीप - २०२४ हंगामासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

    खरीप - २०२४ हंगामासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकास्तरावर  तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित   लातूर, दि.21(जिमाका)-     खरीप- २०२४ हंगामात लातूर जिल्ह्यातील कृषि निविष्ठा केंद्रांवरून बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषि निविष्ठा खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जा बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर, तसेच प्रत्येक तालुकास्तरावर एक १० असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी दिली. खरीप-२०२४ हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि गुणात्मक दर्जाच्या कृषि निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषि विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषि निविष्ठांची तपासणी करण्यात येते.   यानंतरही शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा विक्री केंद्रावरून कृषि निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषी निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता आदीबाबतीत संशय आल्यास