शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणांचा आग्रह न धरण्याचे कृषि विभागाचे आवाहन

 शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाच्या

बियाणांचा आग्रह न धरण्याचे कृषि विभागाचे आवाहन

लातूरदि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरु असून अहमदपूर व जळकोट तालुक्यामध्ये कापूस पिकाचा पेरा केला जातो. सर्व कंपन्यांचे सर्व कापूस बी.टी. वाण चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यंनी कोणत्याही एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. तसेच कापूस बियाण्यांचा विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कृषि सेवा केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईलअसे त्यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी विविध कंपन्याच्या कापूस बियाण्यांना पसंती देतात. या बियाण्यांना मागणी असल्याने त्यांच्या विक्रीत वाढ होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. यातून विक्रेत्यांकडून या बियाण्यांची जादा दराने विक्री केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर तालुका कृषि अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची कृषि केंद्र स्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जादा दराने बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी छुप्या पद्धतीने गस्त करत आहेत. जिल्ह्यात बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाकडून सातत्याने तपासणी सुरु आहे. कृषि सेवा केंद्रामध्ये अशाप्रकारे वाढीव दरात कापूस बियाणे विक्री केल्यास त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  श्री. जाधव  व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. चोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु