शहरी भागातील मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

 शहरी भागातील मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

·         नालेसफाई, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांबाबत उपाययोजना करा

लातूरदि. 15 (जिमाका) : आगामी पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई करण्यासोबतच रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फांद्या, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त आणि सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नालेसफाई ण झाल्यास नालीतील कचऱ्यामुळे नाले तुंबून घाण पाणी रस्त्यावर, तसेच नागरिकांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या वादळामध्ये लोकांच्या अंगावर पडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकानगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रातील नाली, गटारीची साफसफाईरस्त्यावर येणाऱ्या फांद्या व रस्त्यावर लोंबकाळणाऱ्या विद्युत वाहिन्यांबाबत आवश्कयक कार्यवाही 31 मे, 2024 पूर्वी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु