राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे मोलाचे योगदान कर्नल हेमंत जोशी

 

 लातूर,दि.21(जिमाका)-  ५३ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय  छात्र सेना यांच्या अधिपत्याखाली  वार्षिक प्रशिक्षण शिबीर १६ ते २५ मे २०२४ दरम्यान खंडापूर येथील शासकीय मुला - मुलींचे वसतिगृह येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्धघाटन  कमान अधिकारी तथा वार्षिक प्रशिक्षण अधिकारी कर्नल हेमंत जोशी  यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्रीय सेनेचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       कॅडेटमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी एकता व शिस्तवेळेचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. कॅम्पमध्ये लागलेली सवय त्यांनी निरंतर जीवनामध्ये सुरू ठेवावी, असे कर्नल जोशी म्हणाले.

या कॅम्पसाठी धाराशिव व लातूर जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 450 एन सी सी मुला - मुलींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये फिजिकल ट्रेनिंग तसेच ड्रिलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान ०.२२ रायफलची पूर्ण माहिती तसेच फायरिंग प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. मॅप रीडिंगखेळ व सांस्कृतिक तयारी करून घेतली जाणार आहे. विविध विषयांवर तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच हॉलीबॉलगार्ड ऑफ ऑनरप्रश्नमंजुषा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

         कॅम्पच्या यशस्वीतेसाठी कमान अधिकारी कर्नल हेमंत जोशी व प्रशासनिक अधिकारी वाय. बी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जे.सी.ओ. सुभेदार शेखर थोरातसुभेदार शेख पाशासुभेदार उत्तम पाटीलसुभेदार हरिंदर सिंगनायब सुभेदार बाजीराव पाटीललेफ्ट. डॉ. अतिश तिडकेलेप्ट. गुणवंत ताटेथर्ड ऑफिसर सिद्दिकी जे. के.मकरंद पाटीलबी.एच.एम. योगेश बारसेहवालदार अजमेर सिंगबी. व्ही. घोगरेआर. आर. पवार तसेच पी. आय स्टाफ हे  कॅम्पच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु