मतदान यंत्र सुरक्षा कक्ष परिसराची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी


 मतदान यंत्र सुरक्षा कक्ष परिसराची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

लातूर, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहेत. येथील सुरक्षा व्यवस्थेची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला.

मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाच्या परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलामार्फत त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सुरक्षा कक्ष असलेल्या इमारतीच्या परिसरातील बंदोबस्ताची पाहणी केली. तसेच अनुषंगिक सूचना दिल्या. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना सुरक्षा कक्षाचे थेट चित्रण पाहण्यासाठी स्वतंत्र कक्ष याठिकाणी तयार करण्यात आला असून या कक्षालाही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु