लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानानिमित्त 7 मे रोजी लातूर जिल्ह्यातील आठवडी बाजार राहणार बंद

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानानिमित्त 7 मे रोजी लातूर जिल्ह्यातील आठवडी बाजार राहणार बंद



लातूर, दि. 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदार संघात मंगळवार, 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. तसेच मतदान शांततेत पार पडावे, यासाठी जिल्ह्यात 7 मे, 2024 रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचा आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्यात येणार आहे. मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1982 चे कलम 5 (अ) मधील तरतुदीनुसार पणन संचालक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.


मंगळवार, 7 मे 2024 लातूर तालुक्यातील मुरुड, औसा तालुक्यातील भादा आणि तावशीताड, रेणापूर तालुक्यातील भाकरंबा, निलंगा तालुक्यातील माकणी थोर, चिंचोली (सा) , चिंचोली (भं) आणि शिरोळ (वां), शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ व हिसामाबाद, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती, चाकूर तालुक्यातील नळेगाव, जळकोट तालुक्यातील अतनुर या ठिकाणी होणारे आठवडी बाजार 7 मे 2024 ऐवजी इतर दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु