लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानानिमित्त 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर इतर जिल्ह्यात राहणाऱ्या मतदारांनाही सुट्टीचा लाभ

 लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


मतदानानिमित्त 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर


इतर जिल्ह्यात राहणाऱ्या मतदारांनाही सुट्टीचा लाभ

 


लातूर, दि. 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रमानुसार तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे 2024 रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यावेळी मतदारांना आपला हक्क बजाविता यावा, यासाठी 7 मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कामासाठी मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही यादिवशी सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.


राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 3 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानादिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या लातूर, रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा लोकसभा मतदारसंघात 7 मे 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु