लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 2 मे रोजी दुसरी तपासणी

 लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 2 मे रोजी दुसरी तपासणी


 लातूर, दि. 01 : लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत लातूर 41 (अ.जा) लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची निवडणूक विषयक खर्चाच्या नोंदवहीची दुसरी तपासणी 2 मे 2024 रोजी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून केली जाणार आहे. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहामध्ये सकाळी 10 वाजता तपासणी सुरु होईल.


या तपासणीसाठी उमेदवाराने स्वतः किंवा त्यांचा प्राधिकृत निवडणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्चाची नोंदवही, प्रमाणके, निवडणुकीसाठीच्या खर्चाचे बँक पासबुकसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. खर्चाच्या नोंदवह्यांच्या तपासणी दरम्यान जनतेचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात आणि प्रत्येक पृष्ठास 1 रुपये इतकी रक्कम प्रदान केल्यावर कोणतीही व्यक्ती कोणत्याही उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून घेऊ शकतात, असे 41- लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेव चाटे यांनी कळविले आहे.

**

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु