उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपसणी पूर्ण

 उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपसणी पूर्ण


अनुपस्थित एका उमेदवाराला देण्यात येणार नोटीस 


 लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गुरुवारी शासकीय विश्रामगृह सभागृहात झाली.


जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे, राजेंद्र नागणे, श्री. ऐनवाड यांची उपस्थिती होती.


लातूर लोकसभा मतदारसंघातील 27 उमेदवारांनी यावेळी आपला खर्च तपासणीसाठी सादर केला. उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब स्वीकारणारे पथक प्रमुख, लेखाधिकारी व सहायक लेखा अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व उमेदवारांच्या खर्चाची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच एका अनुपस्थित उमेदवाराला नोटीस देण्यात येणार आहे.

*** 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु