लातूर येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

 लातूर येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

 

लातूर, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरसहायक जिल्हाधिकारी नमन गोयलप्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारेअहिल्या गाठाळसंगीता टकलेजिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरेलातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी पोलीस दलगृहरक्षक दल, अग्निशमन दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. या पथकांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ना. बनसोडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक यांची भेट घेवून त्यांचा सन्मान केला.  कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारीनागरिकविद्यार्थी उपस्थित होते.

***** 






Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु