जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कार्यवाही करणार-मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर

 जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कार्यवाही करणार-मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर



लातूर, दि. 15 (जिमाका) : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. या कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची गय केली जाणार नाही. कामाचा दर्जा न राखणे, अद्याप ज्यांनी कामे सुरु केलेली नाहीत, तसेच कामाची प्रगती निर्धारित प्रमाणापेक्षा कमी असल्यास अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आज येथे दिला.


जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. सागर बोलत होते. या बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, उप कार्यकारी अभियंता, संबंधित शाखा अभियंता आणि जिल्हा समन्वयक वॅपकोस लि., संबंधित योजनांचे कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.

जलजीवन मिशनची कामे गतीने करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित कंत्राटदार यांनी कार्यवाही करणे आवश्यक असतानाही काही कंत्राटदार या कामांमध्ये दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रशासन व कंत्राटदार यांना ज्या ग्रामपंचायती, सरपंच अथवा इतर संबंधित सहकार्य करत नाहीत, विनाकारण अडथळे निर्माण करतात त्यांच्यावरही प्रशासकीय नियमानुसार सक्त कार्यवाही करण्यात येणार येईल, असे श्री. सागर यांनी सांगितले.

दुष्काळ व पाणी टंचाईच्या कालावधीमध्ये कंत्राटदारांनी निष्काळजीपणा, दिरंगाई केल्यास कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. कंत्राटदारास कोणाकडून विनाकारण त्रास होत असल्यास कंत्राटदारांनी माझ्याकडे थेट तक्रार करावी. त्याची दखल घेऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे श्री. सागर यावेळी म्हणाले. तसेच जलजीवन योजनांची कामे तातडीने, विनाविलंब पूर्ण करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु