लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लातूर जिल्ह्यात मतदान, मतमोजणीमुळे मद्यविक्री राहणार बंद

 लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


लातूर जिल्ह्यात मतदान, मतमोजणीमुळे मद्यविक्री राहणार बंद


 


लातूर, दि. 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तसेच 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिले आहेत.


निवडणूक कालावधीत मतदान  संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासापासून म्हणजेच 5 मे 2024 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच 6 मे 2024 आणि 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. तसेच मतमोजणी निमित्त 4 जून 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु