आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांनी केली स्थिर सर्वेक्षण पथकाची पाहणी शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्याचे दिले निर्देश

 आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांनी केली स्थिर सर्वेक्षण पथकाची पाहणी


शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्याचे दिले निर्देश

लातूर, दि. ३०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने  लातूर शहर  विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकांची जिल्‍हा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद लातूरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक नोडल अधिकारी तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी अचानक पाहणी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

लातूर  लोकसभा मतदार मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. या स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत विविध मार्गावरुन वाहतूक  होणाऱ्या वाहनांची तपासणी करून आदर्श आचारसंहितेचा भंग होणारी कोणतीही बाब आढळून आल्‍यास जप्‍तीची कारवाई करण्‍यात येते. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास प्रसंगी गुन्‍हे देखील दाखल केले जातात.  

लातूर शहर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या बारा नंबर पाटी, श्याम नगर, बार्शी रोड, हरंगुळ चेकपोस्‍ट तसेच पेठ येथील स्थिर सर्वेक्षण पथकांची नोडल अधिकारी अनमोल सागर व बाबासाहेब मनोहरे यांनी पाहणी करून आदर्श आचारसंहिता भंग होणार नाह,  यादृष्‍टीने जास्‍तीत जास्‍त वाहनांची कसून तपासणी करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. या कामात हलगर्जीपणा अथवा कुचराई करणाऱ्या पथकाविरुध्‍द दंडात्मक  कारवाई करण्‍यात येईल, अशी सक्‍त ताकीद  दिली.

आगामी काळात जिल्‍हा आचारसंहिता कक्षामार्फत स्थिर सर्वेक्षण पथकांच्‍या कामकाजाची तपासणी नियमितपणे करण्‍यात येणार असल्याने स्थिर सर्वेक्षण पथकाने सजग राहून अवैध वाहतूकीवर करडी नजर ठेवून करवाई करण्याचे निर्देश श्री. सागर यांनी यावेळी दिले.





Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु