अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ हटविण्याच्या सूचना

 अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ हटविण्याच्या सूचना

·         होर्डिंगची रचनात्मक तपासणी होणार

·         दुर्घटना टाळण्यासाठी केल्या जाणार उपाययोजना

लातूर, दि. 15 (जिमाका) : घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील विनापरवानगी, अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ काढून घेवून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.

महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील विनापरवानगी लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ काढून घेवून संबंधितांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करावी. अवाजवी आकाराचे होर्डिंग बॅनर्स लावण्यास परवानगी देवू नये. होर्डिंग बॅनर्स लावण्यासाठी असलेल्या होर्डिंगची रचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्यात यावी. अवकाळी पाऊस, वादळाच्या काळात जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अशा प्रसंगी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु