महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद

लातूरदि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1 जानेवारी, 2024 पासून बस तिकिटासाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्ययावत केली आहे. या आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 1 जानेवारी ते 20 मे,2024 पर्यंत राज्यातील 12 लाख 92 हजार तिकिटांची ऑनलाईन विक्री झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 9 लाख 75 हजार तिकीटांची विक्री झाली होती. यंदा सुमारे 3 लाख अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. नवीन या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे राज्यात दररोज अंदाजे 10 हजार तिकीटे काढली जात आहेत.

प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्यासाठी एसटीने आपल्या npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच भ्रमणध्वनीवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये 1 जानेवारी, 2024 पासून अमुलाग्र बदल करुन त्या अद्ययावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील दोष दूर झाल्याने नवीन ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत, जेष्ठ नागरिकजेष्ठ नागरिकमहिला सन्मान योजनादिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखील आगाऊ आरक्षण मिळत आहे. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबर MSRTC Bus Reservation ॲपचा वापर प्रवाशांनी करावा, असे अवाहन केले आहे.

ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. हा नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी 24 तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखील तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी 0120-4456456 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु