अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी

विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 29 (जिमाका) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2024-25 अंतर्गत फुलपिक लागवडमशरुम उत्पादनहरीतगृहशेडनेट हाऊसप्लॅस्टिक मल्चिंग20 एचपी टॅक्टरशेतकरी अभ्यास दौरासामूहिक शेततळेवैयक्तिक शेततळे अस्तरीकरणकांदाचाळपॅक हाऊसव प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्ज करताना महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login किंवा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉपसामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतील. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी सातबारा, आठ अबँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेतअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु