मतमोजणी केंद्र परिसरात 4 जून रोजी प्रतिबंधात्मक आदेश लागू

 मतमोजणी केंद्र परिसरात 4 जून रोजी प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूरदि. 29 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च2024 रोजी घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 41- लातूर (अ.जा) लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे2024 रोजी मतदान झाले आहे. तसेच 4 जून2024 रोजी शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोडलातूर येथे सकाळी 8 पासून मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 4 जून 2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी संहीता 1973 चे कलम 144 अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोडलातूर या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटरच्या परिसरामध्ये मंडपेदुकाने उभारणेतसेच मोबाईल फोनकॉर्डलेस फोनपेजरवायरलेस सेटध्वनिक्षेपक व इतर सेटध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनसंबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यक्तीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  मतमोजणीसाठी हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी 4 जून2024 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु