Posts

Showing posts from April, 2025

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

Image
  पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन लातूर, दि. ३० : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तीन दिवस लातूर जिल्हा दौऱ्यावर

Image
  लातूर, दि. 30 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले 30 एप्रिल , 1 मे आणि 2 मे 2025 या तीन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.   पालकमंत्री श्री. भोसले यांचे 30 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी 5:45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा - 2025 समारोप सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 6:30 वाजता अंबेजोगाई रोडवरील अजिंक्य सिटी येथे आगमन आणि राखीव. रात्री 8:30 वाजता एमआयटी मेडिकल कॉलेज कॅम्पस येथील प्रयाग निवास येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम.   पालकमंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत 1 मे रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदना समारंभ होईल. सकाळी 10 वाजता औसा रोडवरील गांधी हॉस्पि...

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त गुरुवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

Image
  लातूर , दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ गुरुवार , 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होईल. राष्ट्रध्वज वंदनाचा हा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागी होता यावे , यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी 1 मे रोजी सकाळी 7:15 ते 9:00 या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभ आयोजित करू नयेत , असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या कार्यालयाला किंवा संस्थेला स्वतंत्रपणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास तो सकाळी 7:15 पूर्वी किंवा सकाळी 9:00 नंतर आयोजित करावा. स्वागतासाठी शाल , पुष्पगुच्छ आणू नका ; पालकमंत्र्यांचे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणत्याही जिल्हा दौऱ्यावर स्वागतासाठी शाल किंवा पुष्पगुच्छ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार , लातूर जिल्हा दौऱ्यावर येताना पदाधिकारी , का...

मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  वेव्हज २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान...

‘वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

Image
   मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित   ‘ जय महाराष्ट्र ’ कार्यक्रमात   ‘ ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ’ वेव्हज-2025 परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.   ‘ जय महाराष्ट्र ’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वा. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.   एक्स-   https://twitter.com/MahaDGIPR , फेसबुक -   https://www.facebook.com/MahaDGIPR , यू ट्यूब -   https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR ,   प्रधान मंत्री   नरेंद्र मोदी यांच्या   संकल्पनेतून ‘ ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ’ म्हणजेच   ‘ वेव्हज-2025 ’ चे आयोजन करण्यात आले   आहे.   ही   परिषद 1 ते 4 मे 2025 या कालावधीत जिओ कन्व्हेशन सेंटर ,  बीकेसी ,  मुंबई येथे   होणार   आहे. जगभर...

#WAVES2025 मध्ये नाविन्य आणि सर्जनशीलतेचा अनुभव घ्या !

Image
  #WAVES2025 मध्ये नाविन्य आणि सर्जनशीलतेचा अनुभव घ्या ! तुम्हीही ३ आणि ४ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित सार्वजनिक अभ्यागत या चळवळीचा भाग होऊ शकतात. आता नोंदणी करा: http:// wavesindia.org/visitor-regist ration … #CreateInIndiaChallenge #WAVES #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit

At WAVES his aura lights up the stage – reminding the world why legends never fade.

Image
The one and only @rajinikanth joins WAVES 2025 to celebrate style, substance and the unstoppable spirit of a superstar. At WAVES his aura lights up the stage – reminding the world why legends never fade. Register at: https:// wavesindia.org #CreateInIndiaChallenge #WAVES

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा "सेवा हक्क दिन"

महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 एप्रिल , 2025 रोजी '28 एप्रिल ' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचा-यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक 28 एप्रिल ,2015 रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष करुन तत्कालीन मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील जनतेला  नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा ' महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015' अंमलात आणला आहे. या अधिनियमातील कलम 4 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचा-यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. हा कायदा प्रशासकीय अधिका-यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत आहे. या कायद्याने नव्याने निर्मित केलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाने आपले ब्रीदवाक्य "आपली सेवा आमचे कर्तव्य " असे निर्धारित केलेले आहे. शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत केलेले बोधचिन्ह ...