लातूर जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह अंतर्गत ममदापूर येथे पथनाट्याद्वारे जनजागृती
लातूर जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह अंतर्गत
ममदापूर येथे पथनाट्याद्वारे जनजागृती
लातूर, दि. 11 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत 10 एप्रिल 2025 रोजी लातूर तालुक्यातील ममदापूर येथील बुद्ध विहारात सामाजिक समता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना पथनाट्याद्वारे समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समतादूत सदा विजय पवार, पद्माकर कांबळे, सचिन मोरे, पुष्पा शिंदे आणि बालाजी गिरी यांनी पथनाट्याद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
हा कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी राजकुमार धनशिरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक राजकुमार धनशिरे यांनी केले, तर यास्मिन शेख यांनी आभार मानले. गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment