जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांचे आयोजन

 जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांचे आयोजन

लातूरदि. ८ (जिमाका): लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये एक युवकएक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारात गौरवपत्रसन्मानचिन्ह आणि वैयक्तिकसाठी १० हजार रुपये आणि संस्थेसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे रोख रक्कमेचा समावेश राहील.

या पुरस्कारासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील सामाजिक कार्यराज्याच्या साधन संपत्तीचे जतन व संवर्धनराष्ट्र उभारणीसाठी सहाय्यभूत कार्यसमाजातील दुर्बल घटकांसाठी कार्यशिक्षणप्रौढ शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसांस्कृतिक, कलाक्रीडाविज्ञानतंत्रज्ञानव्यवसायमहिला सक्षमीकरणव्यसनमुक्तीराष्ट्रीय एकात्मतानागरी वस्ती सुधारणाझोपडपट्टीआपत्ती व्यवस्थापनस्थानिक समस्या सोडवणे आणि साहस यासारख्या क्षेत्रांतील कार्याचा विचार होईल. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील गेल्या तीन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कार दिले जातील.

अर्ज आणि अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सारिका काळे (मो. ७२१८३९०३६७) किंवा क्रीडा अधिकारी धीरज बावणे (मो. ८००७९०७७१३) यांच्याशी संपर्क साधावा. परिपूर्ण अर्ज १५ एप्रिल २०२५ पर्यंत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेतअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन