महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त गुरुवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

 

लातूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ गुरुवार, 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होईल.

राष्ट्रध्वज वंदनाचा हा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी 1 मे रोजी सकाळी 7:15 ते 9:00 या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभ आयोजित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या कार्यालयाला किंवा संस्थेला स्वतंत्रपणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास तो सकाळी 7:15 पूर्वी किंवा सकाळी 9:00 नंतर आयोजित करावा.

स्वागतासाठी शाल, पुष्पगुच्छ आणू नका; पालकमंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणत्याही जिल्हा दौऱ्यावर स्वागतासाठी शाल किंवा पुष्पगुच्छ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लातूर जिल्हा दौऱ्यावर येताना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी भेटीसाठी शाल किंवा पुष्पगुच्छ आणू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन