क्षयरोगाविषयी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम
क्षयरोगाविषयी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम
लातूर, दि. ८ (जिमाका): विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३ एप्रिल २०२५ रोजी क्षयरोगाविषयी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्वसनविकारशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय डॉक्टरांना टीबी प्रतिबंधात्मक उपाय, साय टीबी तपासणी, अत्याधुनिक निदान पद्धती, उपचार आणि फुफ्फुसाबाहेरील क्षयरोग याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी पूजन, डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाले.
अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधिष्ठाता डॉ. उमेश कानडे, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. अजय ओहळ, डॉ. उमेश लाड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम रेड लेक्चर हॉलमध्ये झाला. उद्घाटनाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, श्वसनविकारशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. वाघमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. निलिमा देशपांडे, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ. नामदेव सूर्यवंशी, सर्जरी विभागप्रमुख डॉ. मेघराज चावडा, बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय कुसुमबिवाल, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. सम्यक खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत आणि डॉ. अलका बांगर उपस्थित होते. डॉ. परमेश्वर सूर्यवंशी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
डॉ. एस. एन. तांबारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सम्यक खैरे यांनी क्षयरोगाचे नवीन घटक, डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी क्षयरोगाचे निदान, डॉ. अभिजीत यादव यांनी क्षयरोगावरील उपचार, डॉ. विकास सोळुंके यांनी बालकांमधील क्षयरोग, डॉ. विवेकानंद वाघमारे यांनी एमडीआर आणि एक्सडीआर टीबी, डॉ. रुद्रमणी स्वामी यांनी गरोदर मातांमधील क्षयरोग आणि डॉ. नम्रता आचार्य यांनी प्रतिबंधात्मक उपचार व प्रौढ बीसीजी लसीकरण यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद साबळे आणि श्रीमती किरण चोथे यांनी केले. डॉ. प्रवीण साखरे, डॉ. वैभव बुड्डे, गाझी ए. एफ., सुबोध मगरे, श्री. सूर्यवंशी डी. आर., साकळे व्ही. बी., अनिल बेळंबकर यांच्यासह श्वसनविकारशास्त्र विभाग आणि जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
*****
Comments
Post a Comment