लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

 लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी

२४ व २५ एप्रिल रोजी सोडत

लातूरदि. २१ (जिमाका): राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागच्या ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार  ५ मार्च २०२५ ते   मार्च  २०३० या कालावधीसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसुचित जमातीनागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जातीअनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातील आरक्षण सोडत देवणी तहसील कार्यालय येथे २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. तसेच उर्वरित सर्व तालुक्यातील ग्रामपंचायातींसाठी २४ एप्रिल २०२५ रोजी संबंधित तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होईल.

लातूर जिल्‍ह्यातील १६० सरपंच पदे अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी ८० पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २१ सरपंच पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी ११ ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २११ सरपंच पदे रहिव असून यापैकी १०६ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील. तसेच ३९३ ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहणार असून यापैकी १९७ ठिकाणी महिलांना संधी मिळेल. एकूण ७८५ पैकी ३९४ ठिकाणी महिला सरपंच राहणार आहेत.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालायामार्फ्त १७ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच  निवडणूक नियम), १९६४ चे नियम २-अ च्‍या पोट नियम () व (नुसार अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) लातूर जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्‍ये सरपंच पदे निश्‍चीत करून देण्यात आली आहेत. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी  संबंधित उपविभागीय अधिकारी यांना संपर्क प्रमुख म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आले असून आरक्षण सोडत संबंधित तहसिलदार कार्यालयात पार पडणार आहे.

असे राहील सरपंच पदाचे आरक्षण

अ.क्र

 

तालुक्याचे नाव

तालुक्‍यातील एकूण ग्रा.पं संख्‍या

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी
आरक्षित सरपंच पदे

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी
आरक्षित सरंपच पदे

ना.मा.प्र प्रवर्गाासाठी आरक्षित सरपंच पदे

सर्वसाधारण प्रवर्गासाठी
सरपंचाची पदे

अनु.जाती

महिला

अनु. जमाती

महिला

ना.मा.प्र

महिला 

सर्वसाधारण प्रवर्ग

महिला

1

लातूर

110

12

11

1

1

15

15

27

28

2

रेणापूर

65

6

6

1

0

9

9

17

17

3

औसा

109

10

9

1

1

15

14

30

29

4

निलंगा

116

10

11

3

2

15

16

30

29

5

शिरुर अनंतपाळ

42

5

5

0

1

5

6

10

10

6

देवणी

45

5

4

1

1

6

6

11

11

7

उदगीर

87

11

11

1

1

12

11

20

20

8

जळकोट

43

5

6

0

1

6

6

9

10

9

अहमदपूर

97

9

10

1

2

13

13

24

25

10

चाकूर

71

7

7

1

1

9

10

18

18

लातूर जिल्‍हा एकूण

785

80

80

10

11

105

106

196

197

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन