लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बेवारस वाहनांचा 12 एप्रिलला जाहीर लिलाव
लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे
बेवारस वाहनांचा 12 एप्रिलला जाहीर लिलाव
लातूर, दि. 11 (जिमाका): लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 24 बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव 12 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 19 तीनचाकी, 3 चारचाकी, 2 सहाचाकी आणि 56 मोटारसायकलींचा समावेश आहे. ही सर्व वाहने भंगार (स्क्रॅप) स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध असतील.
लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक खरेदीदारांना 50 हजार 500 रुपये रोख अनामत रक्कम जमा करून टोकन घ्यावे लागेल, यापैकी 500 रुपये परतावे नसतील. अनामत रक्कम 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी लागेल. केवळ टोकनधारकांनाच लिलावात बोली लावता येईल. लिलावात अंतिम बोली लावणाऱ्या खरेदीदाराने त्याच दिवशी 25 टक्के रक्कम (अनामत रक्कमेसह) रोखीने जमा करावी लागेल आणि उर्वरित रक्कम 15 एप्रिल 2025 पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये भरावी लागेल. ही वाहने भंगार म्हणून विकली जाणार असल्याने त्यांची नोंदणी रद्द होईल आणि ती पुन्हा वापरता येणार नाहीत.
लिलावाला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास, लिलाव रद्द करण्याचा किंवा अन्य तारखेला घेण्याचा अधिकार पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे असेल. अधिक माहितीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment