भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी जय भीम पदयात्रा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी जय भीम पदयात्रा
दयानंद महाविद्यालय मैदानावरून सकाळी ७ वाजता होणार पदयात्रेला सुरुवात
लातूर, दि. ११ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल २०२५ रोजी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय भीम पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
दयानंद महाविद्यालय मैदान येथून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत जय भीम पदयात्रा सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर पदयात्रेचा समारोप होईल.
लेझीम पथक, झांज पथकासह भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी आयोजित केला जाणार आहे. यासोबतच एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट अँड गाईडसह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचा या पदयात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली आहे.
*****
Comments
Post a Comment